नीना गुप्ता होणार आजी! थाटात पार पडलं लेक मसाबाचं बेबी शॉवर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:09 IST2024-08-26T12:05:19+5:302024-08-26T12:09:29+5:30
काही महिन्यांपूर्वीच मसाबाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. नुकतंच मसाबाचं बेबी शॉवर पार पडलं.

बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच मसाबाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती.
नुकतंच मसाबाचं बेबी शॉवर पार पडलं. याचे फोटो समोर आले आहेत. मसाबाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.
मसाबाने बेबी शॉवरसाठी खास बदामी रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये मसाबा बेबी बंप फ्लाँट करताना दिसून आली.
अगदी लाइट मेकअप आणि खड्यांची ज्वेलरी घालत मसाबाने साधा लूक केला होता. पण, तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लो स्पष्ट दिसून येत असल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
मसाबाच्या बेबी शॉवरसाठी अभिनेत्री सोनम कपूरही उपस्थित होते. याचे फोटो सोनमने शेअर केले आहेत.
मसाबाने गेल्याच वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता ते आईबाबा होणार आहेत.
याआधी मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. पण, लग्नानंतर अवघ्या चारच वर्षांत २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले.