या अभिनेत्रीने लॉकडाऊनमध्ये चक्क रंगवले तिचे केस, तिला ओळखणे देखील होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 08:00 IST2020-04-10T08:00:00+5:302020-04-10T08:00:03+5:30

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

कोरोनामुळे नर्गिस फाकरी तिच्या कॅलिफोर्निया येथील घरातच गेल्या काही दिवसांपासून राहात आहे.

लॉकडाऊनमुळे तिला घराच्या बाहेर देखील पडता येत नाहीये. घरातील कामं देखील तिलाच करावी लागत आहेत.

घरातील कामं करून कंटाळा आल्यामुळे आता नर्गिसने तिचा मेकअप आणि हेअर स्टाईल एका हटके अंदाजात केली आहे.

नर्गिसने चक्क तिचे केस वेगवेगळ्या रंगाने रंगवले आहेत. तसेच वेगवेगळ्या रंगाचा वापर करून तिचा मेकअप केला आहे.

नर्गिसनेच तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नर्गिसचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत असून या हटके अंदाजात देखील ती खूप छान दिसते असे ते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

















