बायकोचे पुरवले लाड! बॉलिवूड हसिनाला नवऱ्याने बर्थडे गिफ्ट म्हणून दिली कोटींची 'रोल्स-रॉईस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:34 IST2025-11-24T11:23:08+5:302025-11-24T11:34:05+5:30

वाढदिवसाला मिळाली कोटींची रोल्स-रॉईस, बॉलिवूड हसिनाला नवऱ्याकडून सरप्राईज!

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच तिच्या स्टाईल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

गेल्या महिन्या २० ऑक्टोबर रोजी नर्गिसचा ४६ वा वाढदिवस साजरा झाला. तिचा ४६ वा वाढदिवस खूपच खास ठरला. कारण, तिचा नवरा उद्योगपती टोनी बेगने तिला खूपच अद्भुत गिफ्ट दिलं. ज्याची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

नर्गिस फाखरीला तिच्या पतीने तब्बल १०.३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची निळ्या रंगाची आलिशान Rolls Royce Cullinan ही कार भेट म्हणून दिली.

नर्गिसने तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतर महिनाभराने नवीन कारसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चमकदार लाल ड्रेसमध्ये नर्गिसने कारसोबत खास पोझ दिल्या.

एका फोटोत ती चक्क कारवर बसली आहे. ही कार एका मोठ्या लाल रिबनने सजवण्यात आली होती, ज्यामुळे ती खरोखरच एक 'ड्रीम गिफ्ट' वाटत होती. नर्गिसच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

नर्गिस फाखरीने या पोस्टला दिलेले कॅप्शन खूपच मजेदार आहे. तिनं लिहलं, "मी आता विचार करत आहे की मला २०२६च्या वाढदिवशी काय भेट मिळेल टोनी बेग? मला वाढदिवसाच्या शुभेच्छा!".

नर्गिस फाखरी आणि उद्योजक टोनी बेग यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये गुपचूप लग्न केले. या समारंभात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर हे जोडपे स्वित्झर्लंडमध्ये हनिमूनसाठी गेले.

लग्न करण्यापूर्वी दोघांनी एकमेकांना सुमारे तीन वर्षे डेट केले. टोनी बेग हा एक इंडो-अमेरिकन बिझनेस टायकून आहे ज्याचा जन्म १९८४ मध्ये भारतातील काश्मीरमध्ये झाला होता.

नर्गिसचा जन्म अमेरिकेतच झाला आहे. तिने २०११ साली 'रॉकस्टार' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर ती 'मै तेरा हिरो', 'अजहर', 'शिव शास्त्री बाल्बोआ', 'हाऊसफुल ३', 'मद्रास कॅफे', 'ढिशूम', 'स्पाय', 'फटा पोस्टर निकला हिरो' या सिनेमांमध्येही झळकली.

नर्गिसच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'मस्ती ४'मध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. त्यापूर्वी ती 'हाऊसफुल ५'मध्ये झळकली होती.