नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार आहे खूप टॅलेटेंड, दिसतो वडिलांसारखा हुबेहूब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 11:03 AM2022-11-18T11:03:11+5:302022-11-18T11:07:11+5:30

Nana Patekar : नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हारदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. जाणून घ्या त्याच्याबद्दल

नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेतेच नाहीत तर लेखक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. त्यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

नानांचे लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्याशी झाला होता आणि त्या दोघांना मल्हार पाटेकर नावाचा मुलगा आहे.

नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार हुबेहुब नानांसारखा दिसतो. नानांसारखा साधेपणा त्याला खूप आवडतो.

मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे.

मल्हारला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची आवड होती आणि तो प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता, पण नंतर नाना आणि प्रकाश झा यांच्यात भांडण झाले आणि नानांनी मल्हारला प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

नंतर, मल्हारने राम गोपाल वर्माच्या द अटॅक ऑफ 26/11 या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

आता त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावाने सुरू केले आहे. त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस आहे.

नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी एकमेकांना घटस्फोट दिलेला नाही, परंतु दोघेही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहेत.