नाद खुळा, रजनीकांत बनला शिवाजी गायकवाड, जिथं कंडक्टर होता 'त्या' बस डेपोला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 06:19 PM2023-08-29T18:19:15+5:302023-08-29T18:28:44+5:30

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, रजनीकांतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी, योगींच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. त्यामुळे, सोशल मीडियावर अभिनेता ट्रोल झाला होता.

मात्र, मी सर्वच योगींचा, ऋषींचा सन्मान करतो, म्हणून पाया पडलो, असे स्पष्टीकरण रजनीकांतने दिले आहे. त्यानंतर, आता रजनीकांत पुन्हा एकदा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रजनीकांतचा प्रवास शिवाजी गायकवाड ते सुपरस्टार रजनीकांत असा बनलाय. सर्वसामान्य कुटुंबातील शिवाजी गायकवाड हा बस कंडक्टर होता तिथूनच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि तो सुपरस्टार रजनीकांत बनला.

रजनीकांतने आज त्याच बस डेपोला भेट दिली, ज्या बस डेपोमध्ये तो कधीकाळी कंडक्टर बनून काम करत होता. रजनीकांतने जवळचा मित्र राज बहादूरसह बंगळुरू मेट्रोपोलियन ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या जय नगर बस डेपोला भेट दिली.

एकेकाळी हे दोघे मित्र येथील बस डेपोत काम करत होते. रजनीकांत आणि राज बहादूर हे येथील बस डेपोमध्ये कंटक्टर म्हणून काम करत होते.

त्यामुळे, या भेटीत सुपरस्टार अभिनेत्याने बस ड्रायव्हर, कंडक्टर, मॅकॅनिक आणि इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी, रजनीकांतसोबत फोटो काढण्यासाठी सर्वांची एकच झुंबड उडाली होती.

अभिनेत्यानेही सर्वांसोबत फोटो घेत जुन्या आठवणी जागवल्या. रजनीकांत अनेकदा बंगळुरुला आल्यावर आपल्या जुन्या मित्रांची भेट घेऊन वेळ घालवत असतो.

दरम्यान, सध्या जेलरच्या यशाचं सेलिब्रेशनही रजनीकांत करत आहे. रजनीच्या जेलरने वर्ल्डवाईड तब्बल ५०० कोटींची कमाई केली आहे. दोन वर्षांनंतर रजनीचा सिनेमा आल्याने चाहत्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे.