कोण आहे फातिमा बॉश? स्पर्धेतून वॉकआऊटपासून विनरपर्यंत राहिला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:32 IST2025-11-21T18:14:54+5:302025-11-21T18:32:25+5:30
जिला सगळ्यांसमोर 'मूर्ख' म्हटलं… तिनेच जिंकला 'मिस युनिव्हर्स २०२५'चा ताज!

Fatima Bosch Miss Universe 2025: सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने यंदाचा ७४ वा मिस युनिव्हर्स (Miss Universe) २०२५ चा किताब जिंकला आहे.

थायलंडमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेचा समारंभ भव्य असला तरी, फातिमाचा हा प्रवास अत्यंत वादग्रस्त ठरला.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच ती एका वादामुळे चर्चेत आली होती. मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका कार्यक्रमात फातिमाला सर्व स्पर्धकांसमोर फटकारण्यात आलं होतं. हा संपूर्ण वाद एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान घडला.

४ नोव्हेंबर रोजी सॅशिंग सेरेमनती फातिमा बॉशला थायलंडचे पेजंट डायरेक्टर नवात इत्साराग्रिसिल यांनी 'मूर्ख' म्हटलं होतं. फातिमा थायलंडला प्रमोट करणाऱ्या पोस्ट करत नाही, असा दावा त्यांनी केला.

यामुळे फातिमा संतापली आणि नवात इत्साराग्रिसिलमहिलांचा आदर करत नसल्याचं तिनं म्हटलं. यानंतर नवात त्यांनी सिक्युरिटीला सांगितलं की फातिमाला बाहेर काढण्यात यावं.

अपमान झाल्यावर फातिमा भडकली आणि ती स्पर्धा सोडून निघून गेली होती. यावेळी तत्कालीन मिस युनिव्हर्ससह इतर अनेक स्पर्धक तिच्यासोबत बाहेर पडल्या.

या घटनेनंतर नवात इत्साराग्रिसिल यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याला तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. टीका वाढल्यावर त्यांनी माफी मागितली. पण, या संपूर्ण वादात फातिमा बॉशची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि आत्मविश्वासाने भरलेली होती.

त्यानंतर फातिमाने केवळ स्पर्धेत पुनरागमन केले नाही, तर थेट किताब जिंकून 'मूर्ख' म्हणणाऱ्याला सडेतोड उत्तर दिले.

फक्त २५ वर्षांची फातिमा बॉश फर्नांडिस ही टबास्को येथील सॅंटियागो दे टिपा शहरातील रहिवासी आहे. ती मेक्सिकोमध्ये महिला शिक्षण आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करते.

फातिमाने २०१८ मध्ये टबास्को येथे 'फ्लोर दे ओरो' हा किताब देखील जिंकला होता. तसेच तिने १३ सप्टेंबर २०२५ रोजी ग्वाडालजारा येथे हा किताब जिंकला होता.

फातिमा बॉश एक मॉडेल आणि डिझायनर आहे. तिने मेक्सिकोमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

















