माधुरी दीक्षितने शेअर केला खास अंदाजातील फोटो, नेटिझन्सने दिल्या अशा कमेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 20:10 IST2021-06-03T20:10:02+5:302021-06-03T20:10:02+5:30

माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत. आजही तिला तितकेच फॅन फॉलोव्हिंग आहे.
माधुरी तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते.
माधुरीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
माधुरी निळ्या रंगाच्या लेहंगामध्ये खूपच छान दिसत आहे.
माधुरी आजही तितकीच सुंदर दिसते असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
माधुरीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. तिने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
माधुरीच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते. तिच्या हास्यावर तर तिचे चाहते फिदा आहेत.
माधुरी सोशल मीडियाद्वारे नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.