नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटाचे वेगळेच कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 12:29 IST2021-12-20T12:14:26+5:302021-12-20T12:29:29+5:30

सेलिब्रेटी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. फिल्मी करिअर वगळता त्यांच्या खासगी आयुष्यातल्या घडामोडींमुळेही ते चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth prabhu) त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत.

हे दोघे घटस्फोट घेणार याच बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता.त्यानंतर दोघांनीही ते घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले होते.

तेव्हापासून चाहते या दोघांच्या घटस्फोटाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. रोज नवीन नवीन कारणं समोर येत होती.

आता पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाचे नवीन कारण समोर आले आहे. मुळात नागा चैतन्यने याविषयी मनमोकळेपणाणे बोलणे नेहमीच टाळले होते.

आता दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यावरुन आपले मौन सोडले आहे. त्यांच्या नाते तुटण्याला कारणीभूत समंथा असल्याचे त्याने म्हटले आहे.

मुळात लग्नानंतर समंथाचे करिअर सुस्साट सुरु होते. त्यातही बोल्ड भूमिका साकारणे नागा चैतन्य आणि कुटुंबाला खटकत होते.

अनेकदा नागा चैतन्य आणि कुटुंबाने समंथाला समजवण्याचा प्रयत्न केला.

मुळात अक्किनेनी घराची सून बनल्यानंतर समांथाने सासू अमाला अक्किनेनीसारखेच वागायला हवे अशी सगळ्यांची अपेक्षा होती.

पण समंथा मात्र कुटुंबाच्या अटी मान्य नव्हत्या. शेवटी दोघांच्या नात्यातही फुट पडायला सुरुवात झाली आणि घटस्फोट हाच पर्याय दोघांपुढे होता.

लग्नापूर्वी काही वर्ष दोघेही एकमेकांना डेट करत होते. चार वर्ष दोघांचे अफेअर सुरु होते. त्यानंतरच दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

6 अक्टूबर 2017 मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले होते.