न्यूड फोटोशूट ते निम्म्या वयाच्या मुलीशी केलं लग्न, 'या' अभिनेत्यानं नाश्त्यासाठी अर्ध्यात सोडला होता चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:47 PM2024-05-10T16:47:13+5:302024-05-10T17:09:20+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, जे त्यांच्या चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चत राहतात. असाच एक अभिनेता आहे, ज्यानं न्यूड फोटोशूट करुन धुमाकूळ घातला होता. या अभिनत्याला त्याच्या कामातून नाही, तर वैयक्तीक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली.

या अभिनेत्यानं ९० च्या दशकात सुपरमॉडेल म्हणून काम केलं. नंतर तो अभिनयातही उतरला. हा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. आज वयाची ५८ वर्ष पार करुनही तो आपल्या फिटनेसने तरुणांना मागे टाकतो.

मिलिंद त्याच्या कारकिर्दीत त्याच्या कामापेक्षा त्याच वैयक्तिक आयुष्य आणि वादांमुळे जास्त चर्चेत राहिला आहे. एकदा त्याच्या न्यूड फोटोशूटने खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी सर्वत्र त्याचीच चर्चा होत होती.

मिलिंद सोमण पुन्हा एकदा न्यूड फोटोशूटनंतर प्रकाशझोतात आला, जेव्हा त्याने त्याच्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली होती.

मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांच्या नात्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

मिलिंदने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तो एकही सोलो हीट देऊ शकलेला नाही. त्याची गणना बॉलिवूडच्या फ्लॉप कलाकारांमध्ये केली जाते.

मिलिंद सोमणने आपल्या कारकिर्दीत साइड ॲक्टर म्हणून काम केलं आहे. यामध्ये 'अशोका', 'अग्नी वर्षा रूल्स', 'प्यार का सुपर-हिट फॉर्म्युला', 'भ्रम', 'सलाम इंडिया', 'भ्रेजा फ्राय' आणि 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटांचा समावेश आहे. तो त्याच्या कारकिर्दीत कधीही मुख्य अभिनेता बनू शकला नाही.

या अभिनेत्याने एकदा फक्त नाश्त्यामुळे आमिर खानचा चित्रपट हा अर्ध्यात सोडला होता.

मिलिंदची पहिल्यांदा 1992 च्या 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटात दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. सेटवर वेळेत नाश्ता मिळत नव्हता, म्हणून त्यानं चित्रपट अर्ध्यातच सोडला होता.

मिलिंद सोमण हा खूप शिस्तप्रिय आहे. तो वेळेवर खातो, वेळेवर झोपतो. आजही वयाच्या ५८व्या वर्षी तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. या वयातही तो पुशअप्स करताना अनेकदा त्याचे व्हिडीओ शेअर करतो.

सोशल मिडियाच्या माध्यमातूनही तो त्याच्या चाहत्यांना नेहमीच फिटनेससाठी मोटिव्हेट करत असतो. फिटनेस जपण्यासाठी तो व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टी जिवापाड सांभाळतो.