KL Rahul-Athiya Wedding : ३० लाखांचं घड्याळ, ऑडी कार! नव दाम्पत्य आथिया-केएल राहुल यांना मिळाली महागडी गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:48 IST2023-01-24T18:38:30+5:302023-01-24T18:48:28+5:30

लग्नात पाहुणे येऊन भेटवस्तू देणं अगदी सामान्य गोष्ट आहे, पण बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नानिमित्त मिळालेलं गिफ्ट काही औरच आहे. स्टार्सनी जडलेल्या या लग्नसोहळ्यात कुणी कोट्यवधींचा हार दिला तर कुणी 30 लाखांचा परफ्युम दिला.

सर्वप्रथम अथिया शेट्टीचे वडील सुनील शेट्टी यांच्याबद्दल बोलूया, त्यांनी आपल्या मुलीला लग्नासाठी भेट म्हणून मुंबईत एक अपार्टमेंट दिला आहे. त्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आणि सुनील शेट्टीची मैत्री सर्वांनाच माहीत आहे आणि यानिमित्ताने सलमानने त्याच्या खास मित्राच्या मुलीला एक ऑडी कार भेट दिली आहे, ज्याची किंमत सुमारे 1.63 कोटी रुपये आहे.

जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी खूप जवळचे मानले जातात. जॅकी अथियाला आपली मुलगी मानतो. या खास प्रसंगी त्यांनी चोपर्ड ब्रँडचे घड्याळ दिले आहे, ज्याची किंमत सुमारे 30 लाख रुपये आहे.

अर्जुन कपूर अथिया शेट्टीचा खूप जवळचा मित्र आहे. त्याने लग्नात त्याच्या खास मैत्रिणीला हिऱ्याचे ब्रेसलेट भेट दिले होते. त्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

केवळ बॉलिवूड स्टार्सनीच नाही तर क्रिकेट स्टार विराट कोहली या बाबतीतही किंग असल्याचे सिद्ध झाले. त्याने त्याचा मित्र केएल राहुलला एक बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे, ज्याची किंमत सुमारे 2.17 कोटी रुपये आहे.

माजी कर्णधार माही म्हणजेच महेंद्रसिंग धोनीनेही लग्नाला हजेरी लावली आणि त्याने केएल राहुलला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली. या बाइकची बाजारातील किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे.