करिना कपूरने प्रेग्नंसीलाही मिळवून दिले होते ग्लॅमर, फोटोशूट करत वेधले होते लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 14:43 IST2020-08-17T14:24:21+5:302020-08-17T14:43:56+5:30
करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. तैमुरनंतर करिना पुन्हा एकदा बाळाला जन्म देणार आहे.

पहिल्या प्रेग्नंसी दरम्यान करिना कपूर विश्रांती न घेता सतत कामात बिझी असायची.
प्रेंग्नसी दरम्यान अनेक फोटोशूट, फॅशन शो आणि सिनेमांचे शूटिंग करणे एन्जॉय करायची.
तिचे बेबी बंम्पसह असलेल्या फोटों सर्रास सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे.
सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळायचे.
तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळायचे.
आजही तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो.
सध्या करिना कुटुंबाला आणि तैमूरला वेळ देण्यात व्यस्त असून तिचा फॅमिला टाईम एन्जॉय करताना दिसते.
दुसऱ्यांदा करिना प्रेग्नंट आहे. पुन्हा एकदा तिने शूटिंगला सुरूवात केली असल्याचे फोटो समोर आले होते.
प्रेग्नंसीमध्ये तिच्या चेहऱ्यावर कमालीचा ग्लो आल्याचे पाहायला मिळते.
सैफ आणि करिनानंतर तैमूर त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते.