"मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो, मान मेरी जान..."; जॅकलिनसाठी सुकेशचं जेलमधून 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:25 AM2024-02-20T10:25:03+5:302024-02-20T10:39:48+5:30

Jacqueline Fernandes And Sukesh Chandrashekhar : सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास लव्ह लेटर लिहिलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या चित्रपटांपेक्षा महाठग सुकेश चंद्रशेखरमुळे जास्त चर्चेत आली आहे. सध्या तुरुंगात असलेला सुकेश नेहमीच तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला लव्ह लेटर पाठवतो आणि अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करतो.

सुकेश चंद्रशेखरने पुन्हा एकदा जॅकलिनसाठी व्हॅलेंटाईन डे निमित्त एक खास लव्ह लेटर लिहिलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लेटरमध्ये सुकेश जॅकलिनबद्दल बरंच काही सांगताना दिसत आहे.

सुकेशने अभिनेत्रीसाठी एक खास गाणंही डेडिकेट केलं आहे. 'मान मेरी जान...' हे गाणं डेडिकेट केलं असून तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेचं स्पेशल गिफ्ट इसल्याचं देखील त्याने म्हटलं आहे. तो नेहमीच आपलं प्रेम असं व्यक्त करत असतो.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देताना आपल्या मनातील भावना पत्रात व्यक्त केल्या आणि लिहिलं - "व्हॅलेंटाईन डेच्या या सुंदर आणि खास दिवशी, मी तुला सांगतो की, मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि तू माझ्या हृदयात आहेस."

"व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवसापासून, प्रत्येक सेकंदाला मला तुझी आठवण येते, मी फक्त तुझ्याबद्दलच विचार करत आहे. हा आपला दुसरा व्हॅलेंटाईन आहे जेव्हा आपण एकमेकांपासून खूप दूर आहोत पण आता हे होणार नाही."

"हे आपलं वर्ष आहे, जे आपल्या सभोवतालची सर्व नकारात्मकता आणि अडथळे दूर करणार आहे. आणखी एक गोष्ट, या काळात आपल्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या, आमच्यात काहीतरी वाईट होत आहे हे पाहून अनेकांना मजा येत होती, विशेषत: ज्यांना मी "गोल्ड डिगर" म्हणतो."

"त्यांनी मला इनडायरेक्टली एक मेसेज पाठवला आणि मला तुझ्या विरोधात भडकावलं पण गोल्ड डिगरला हे माहीत नाही की मी त्या लोकांपैकी नाही, जे इतरांचं ऐकून वागतात" असं सुकेशने म्हटलं आहे.

जॅकलीन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी सुकेश चंद्रशेखर तिला त्रास देत असल्याचं म्हटलं आहे. विविध माध्यमांतून छळ आणि धमकावल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर तिने ती मागे देखील घेतली.

जॅकलिन अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू जंगल'मध्ये चित्रपटात काम करणार आहे.. याआधी ती अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटात दिसली होती. यामध्ये एका गाण्यात तिचा स्पेशल अपीयरेंस होता. सध्या ती 'फतेह' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.