Priety Zinta Photos: गालावरची खळी तुझ्या, लावी वेड जीवा... IPLच्या 'प्रिटी वुमन'पुढे भलेभले 'क्लीन-बोल्ड'!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 03:23 PM2024-03-31T15:23:40+5:302024-03-31T16:03:57+5:30

Priety Zinta Smile with Dimple Photos IPL 2024: प्रिती झिंटा अजूनही आपल्या स्मितहास्याने चाहत्यांना घायाळ करतेय

Priety Zinta Smile with Dimple Photos IPL 2024: सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये आयपीएलचा उत्साह आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी कोणी असेल तर ती आहे पंजाब किंग्ज संघाची मालकीण प्रीती झिंटा.

'प्रिटी वुमन' प्रीती झिंटा दिवसेंदिवस आणखी तरुण होत चालली आहे. अभिनेत्रीचं वय 49 आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. सध्या तिची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

प्रीती झिंटाचे आयपीएल दरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतायेत. तिच्या गालावरच्या खळीवर पुन्हा एकदा प्रेक्षक फिदा झालेत

2004 साली आलेल्या वीर-झारा या सिनेमात प्रीती झिंटाला वयस्कर भूमिकेत दाखवण्यात आलं होतं. मात्र खऱ्या आयुष्यात 20 वर्षांनंतरही प्रीती झिंटाचं सौंदर्य हे तरुणींनाही घायाळ करणारं आहे.

गालावरची खळी, सुंदर हास्य यामुळे प्रीती झिंटाने लक्ष वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पंजाबच्या मॅचमध्ये तिने आपल्या टीमला पाठिंबा दिला. यावेळी तिचा लुक चर्चेत होता.

पांढरा ड्रेस लाल ओढणी अशा लुक मध्ये प्रीती सुंदर 'पंजाबी कुडी' दिसत होती. यानंतर सोशल मीडियावर प्रिटी वुमन प्रीती झिंटाच व्हायरल व्हायला लागली.

90 च्या दशकात ती प्रत्येकाचीच क्रश होती. पण आता 2024 मध्येही तिने सौंदर्यात आताच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.

पंजाबी कुडी म्हणून तर ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेतेच. त्याशिवाय वेस्टर्न वन पीस मध्येही ती तितकीच सुंदर दिसते.

आपल्या संघातील खेळाडूंशीही प्रिती वेळोवेळी संवाद साधताना दिसते. मैदानात असो, पॅव्हेलियनमध्ये असो किंवा मैदानाबाहेर असो, ती आपल्या संघाला चिअर करण्यासाठी नेहमीच पुढे असते.