भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्ड अवतार! Photo Viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:51 IST2024-01-03T16:47:55+5:302024-01-03T16:51:47+5:30

भारतीय क्रिकेटपटूची बहिण मालती हिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो पोस्ट करून फॉलोअर्सना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत...

टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर याची बहीण मालती हीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, फॅन्समध्ये या फोटोंची एकच चर्चा सुरू असून, फॅन्सकडून या फोटोंचं कौतुक होत आहे.

मालती चहर ही मॉडेल आहे. तिने हल्लीच स्वीमींगपूलमध्ये फोटोशूट केलं होतं. हे फोटो आता तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

मालती चहरच्या फिल्मी करिअरची सुरुवात इश्क पश्मिना या चित्रपटामधून झाली आहे. या चित्रपटात मालती भाविन भानुशालीसोबत दिसली.

मालती चहरला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तसेच ती काही हॉट फोटोही शेअर करत असते. सध्या तिचे इन्स्टाग्रामवर १ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मालती चहर ही मिस इंडिया -२०१४ ची फायनलिस्ट राहिलेली आहे. त्याचवर्षी तिने मिस नॉर्दन रिजनच्या मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. तिने पोस्ट केलेल्या फोटोवर सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २०२४ हे वर्ष सर्वांसाठी आनंदाचे अन् भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा तिने दिल्या.