'आधी हनीमून...मग लग्न', नवरा तुरुंगात असताना राखी सावंतचं अजब विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 11:12 IST2023-02-17T11:02:54+5:302023-02-17T11:12:34+5:30
Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात सध्या मोठा ड्रामा सुरू आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तिच्या आयुष्यात सध्या मोठा ड्रामा सुरू आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर तिने वेगळे होत असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर तिने आदिलवर फसवणूक, चोरी आणि मारहाणीचा आरोप केला.
राखी सावंत हिने आदिलच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र आता राखी सावंत प्रसार माध्यमांसमोर आली आणि या प्रकरणावर म्हणाली की, आधी हनीमून होणार आणि मग लग्न. राखीचे हे विधान ऐकून सगळेच गोंधळून गेले आहेत.
आदिल आणि तिच्या प्रकरणावर राखी सावंतने मीडियासमोर स्टेटमेंट दिले.
ती म्हणाली की, सर्वात आधी सांगू इच्छिते की, राखीला न्याय मिळालेला नाही. एका भारतीय पीडित महिलेला न्याय मिळाला आहे. आधी लग्न होते आणि मग हनीमून होते.
मात्र या केसमध्ये आधी हनीमून झाला आणि मग लग्न होणार आहे.
याचा अर्थ असा आहे की, आधी आरोपीला पोलीस कोठडी मिळते आणि नंतर न्यायालयीन कोठडी. पण इथे त्याला आधी न्यायालयीन कोठडी मिळाली आणि आदिलला पोलीस कोठडी मिळणार आहे.
यासोबत राखी सावंत म्हणाली की, पोलीस कोठडी मिळणे यासाठी गरजेचे होते कारण त्याशिवाय कसे समजले असते की माझ्या आईचे दागिने आणि इतर गोष्टी कुठे आहेत. मी लावलेली कलमे कशी सिद्ध होतील.
आदिल दुर्रानी आणि तनू चंदेल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचा आरोप राखी सावंतने केला होता. तनुमुळेही आदिलने तिची फसवणूक केली आहे.