हार्दिक पंड्याच्या जाहिरात शूटिंगस्थळी पोहचली एली अवराम, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-21T13:35:03+5:302018-06-27T19:54:07+5:30
बिग बॉस सीजन-७ ची स्पर्धक तथा अभिनेत्री एली अवराम आणि भारतीय क्रिकेट संघाचा आॅलराउंडर हार्दिक पंड्या यांच्यातील अफेअरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. एकमेकांना डेट करीत असलेले हार्दिक आणि एली मुंबईतील गोरेगावस्थित फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये एकमेकांची भेट घेताना दिसून आले. याठिकाणी हार्दिक कुठल्या तरी जाहिरातीची शूटिंग करीत होता. वास्तविक दोघे एकत्र कॅमेºयासमोर आले नाहीत. जेव्हा एलीच्या दिशेने कॅमेरे सरसावले तेव्हा तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत कार गाठली अन् स्टुडिओच्या दिशेने रवाना झाली, पाहा तिचे काही फोटो!