पहिलं मानधन ५ हजार, आता घेते ३० कोटी! कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री, जी ठरली देशातील 'सर्वाधिक मानधन' घेणारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:56 IST2025-11-17T17:31:35+5:302025-11-17T17:56:58+5:30

ज्या अभिनेत्रीचे पहिले वेतन ५ हजार रुपये होते, ती आज एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेत आहे. होय, या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटासाठी इतकी मोठी फी आकारली आहे की ती सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

ज्या अभिनेत्रीचे पहिले वेतन ५ हजार रुपये होते, ती आज एका चित्रपटासाठी ३० कोटी रुपये मानधन घेत आहे. होय, या अभिनेत्रीने तिच्या आगामी चित्रपटासाठी इतकी मोठी फी आकारली आहे की ती सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

या अभिनेत्रीने २००० च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिने आधी मॉडेलिंग आणि नंतर अभिनयाच्या जगात आपले स्थान निर्माण केले. आज ती केवळ बॉलिवूड किंवा साऊथ सिनेसृष्टीपुरती मर्यादित नाही, तर तिने हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आज ती बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीपेक्षा हॉलिवूडमध्ये अधिक सक्रिय आहे. ती ६ वर्षांनंतर भारतीय सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहे. आता तुम्ही समजू शकता की आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा आहे.

रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्राला तिच्या पहिल्या व्यावसायिक कामासाठी ५,००० रुपये फी मिळाली होती, पण आज ती प्रत्येक प्रोजेक्टसाठी कोट्यवधी रुपये घेत आहे.

कोईमोईच्या रिपोर्टनुसार, प्रियांका तिच्या आगामी चित्रपट 'वाराणसी'साठी ३० कोटी रुपये आकारत आहे. एवढी फी घेऊनच ती या वर्षातील 'हाएस्ट पेड ॲक्ट्रेस' बनली आहे.

याआधी भारतात सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट होत्या, ज्या एका चित्रपटासाठी सुमारे २० ते २५ कोटी रुपये घेत असत. असो, प्रियांकाला भारतात भलेही ३० कोटी रुपये मिळत असले तरी, ती हॉलिवूडमध्ये याहून अधिक फी घेते.

रिपोर्टनुसार, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओच्या हिट सीरिज 'सिटाडेल' साठी अभिनेत्रीला ४१ कोटी रुपये मानधन मिळाले होते.

प्रियांका चोप्रा सध्या एस. एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपट 'वाराणसी' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात महेश भट आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रियांका मंदाकिनीची भूमिका साकारत आहे.