लग्नानंतर दोनच महिन्यांनी एवलिन शर्माने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 01:51 PM2021-07-11T13:51:53+5:302021-07-11T14:01:20+5:30

‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. होय, लग्नानंतर दोनच महिन्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे.

‘ये जवानी है दीवानी’ फेम अभिनेत्री एवलिन शर्मा लवकरच आई होणार आहे. होय, लग्नानंतर दोनच महिन्यांनी ही गुडन्यूज चाहत्यांशी शेअर केली आहे.

एवलिनने एक फोटो शेअर केला आहे. मी तुला माझ्या कुशीत घेण्याची वाट पाहू शकत नाही..., असे कॅप्शन देत एवलिनने आई होणार असल्याची बातमी शेअर केली आहे.

गत 15 मे रोजी ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचा डेंटल सर्जन डॉ. तुषान भिंडीसोबत एवलीनने लग्नगाठ बांधली होती.

लग्नानंतर महिनाभराने त्यांनी लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

एवलिन व तुषानची पहिली भेट 2018 साली झाली होती. दोघेही एका ब्लाइंट डेटवर एकमेकांना भेटले होते.

दोघांच्या मित्रांनी ही ब्लाइंड डेट अरेंज केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. 2019 मध्ये सिडनीच्या हार्बर ब्रीजवर गुडघ्यावर बसून तुषानने एवलिनला प्रपोज केले होते.

2012 मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्री एवलिन एवलिन शमार्चा जन्म जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे झाला.

चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी युकेमध्ये तिने शिक्षण पूर्ण केले. रणबीर कपूर आणि दीपिकाच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील भूमिकेनंतर एवलिन प्रकाशझोतात आली.

मैं तेरा हिरो,जब हॅरी मेट सेजल, साहो या सिनेमातही ती दिसली आहे.