ड्रीम गर्ल अनन्या पांडेनं केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेरासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 06:47 PM2023-09-13T18:47:45+5:302023-09-13T18:56:37+5:30

अनन्या पांडेचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुंदर दिसत आहे.

नुकतेच अनन्याने लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात हजेरी लावली. लोकमत अवॉर्डसाठी अनन्याने खास लूक केला होता. तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी (१२ सप्टेंबर) पार पडला.

अनन्याचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर अनन्याने मराठीत आभार मानले. “थँक्यू लोकमत...मी आपली खूप आभारी आहे”, असं अनन्या मराठीत म्हणाली.

नुकताच अनन्याचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने आयुष्मान खुरानाबरोबर मुख्य भूमिका साकारली आहे.

अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने ‘पती पत्नी और वो’, ‘खाली पिली’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटांत काम केलं आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. त्या दोघांच्या व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.