या छोट्या मुलीला ओळखलं का? आज सुप्रसिद्ध अभिनेत्री असून 'मुंज्या'मध्ये केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 03:14 PM2024-07-11T15:14:09+5:302024-07-11T15:25:15+5:30

फोटोत दिसणारी चिमुरडी आज सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिने 'मुंज्या' सिनेमा गाजवलाय (munjya)

फोटोत दिसणाऱ्या या चिमुरडीला ओळखलं का? ही चिमुरडी आता मोठी अभिनेत्री झाली असुन तिने मुंज्या हा बॉलिवूड सिनेमा गाजवलाय

ही चिमुरडी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे भाग्यश्री लिमये

भाग्यश्री लिमयेने नुकत्याच रिलीज झालेल्या मुंज्या सिनेमात अभिनय केलाय

भाग्यश्री लिमयेला मुंज्या सिनेमात शर्वरी वाघ आणि अभय वर्मा या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली

शर्वरी आणि भाग्यश्री लिमयेची जोडी आणि पडद्यावरील केमिस्ट्री सर्वांना आवडली

भाग्यश्री लिमयेसोबत आजींच्या भूमिकेत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहास जोशी बघायला मिळाल्या

भाग्यश्री लिमयेने मुंज्या सिनेमात अभय वर्माच्या चुलत बहिणीची रुक्कूची भूमिका साकारली