OMG!! डिनो मोरियाचे फोटो पाहून चाहते झाले थक्क; म्हणाले, भाई क्या हालत हो गई है

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 05:27 PM2021-03-18T17:27:47+5:302021-03-18T17:39:16+5:30

‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आत्ताचा डिनो पाहाल तर चाट पडाल.

‘राज’ या चित्रपटात दिसलेला बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेता डिनो मोरिया तुम्हाला आठवत असेलच. आत्ताचा डिनो पाहाल तर चाट पडाल. होय, या फोटोत डिनोला ओळखणेही कठीण आहे.

गेल्या काही दिवसांत डिनो अगदीच बदलला आहे. वाढलेले केस, वाढलेली दाढी अशा वेगळ्या रूपात तो पाहायला मिळतोय.

काही चाहत्यांना डिनोचा हा नवा लूक आवडला आहे. पण काहींनी मात्र त्याला क्लिन शेव्ह करण्याचा सल्ला दिला आहे.

एका चाहत्याने तर ‘भाई क्या हालत हो गई है,’ असे डिनोचे हे नवे फोटो पाहून लिहिले आहे.

आज डिनो रूपेरी पडद्यावरून गायब आहे. पण एकेकाळी याच डिनोवर तरूणी फिदा होत्या.

डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 1999 मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला.

त्याचा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.

‘राज’नंतर डिनो अनेक सिनेमात दिसला. पण हे सर्व चित्रपट एकापाठोपाठ आपटले. चित्रपट चालत नाहीत, म्हटल्यावर डिनो रिअ‍ॅलिटी शोकडे वळला.

2010 मध्ये ‘खतरों के खिलाडी’चे विजेतेपदही त्याने पटकावले. पण यानंतर डिनोला चित्रपट मिळणे बंद झाले.

हाताला काम हवे म्हणून डिनोने डीएम जिम नावाने एक फिटनेस सेंटर उघडले होते. यात तत्कालीन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचीही भागीदारी होती. पण 2016 मध्ये आदित्यसोबत झालेल्या वादानंतर डिनोने हे फिटनेस सेंटर बंद केले.

यानंतर डिनोने त्याच्या कॅफे बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले. गत जानेवारी महिन्यांत डिनो कमबॅक करणार, अशी बातमी आली. पण अद्याप तरी डिनोच्या कमबॅक प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही.