'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हाचा ईद स्पेशल लूक; पांढऱ्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:09 PM2024-04-12T16:09:00+5:302024-04-12T16:16:11+5:30

सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

'दबंग गर्ल' म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फार कमी काळात इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

सोनाक्षी सिन्हा तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सोनाक्षी सिन्हा अगदी कमी मेकअप करते किंवा कधी कधी करतही नाही, मेकअप शिवायही तिची सुंदरता तिळमात्र कमी होत नाही.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी सिन्हाच्या नव्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

या लूकमध्ये सोनाक्षीचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.

सोनाक्षीनं व्हाईट प्रिटेंड ड्रेसला हेवी इअररिंग्सची जोड दिली आहे. तर स्टाईलबाज वेणी तिनं घातली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. या लूकमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.

सध्या अभिनेत्री 'हिरामंडी' सीरिजमुळे चर्चेत आली आहे. सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.