बॉलिवूडची पहिली 'खाष्ट सासू'; सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्रीचा झालेला करुण अंत, वाचून डोळ्यांत पाणी येईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:03 IST2025-09-23T17:50:15+5:302025-09-23T18:03:36+5:30

पडद्यावर साकारली खाष्ट सासू! सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्रीचा चटका लावणारा अंत, तीन दिवस घरातच पडून होता मृतदेह

चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी केवळ नशीब नाही तर जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री ललिचा पवार.

पडद्यावर कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई साकारून प्रेक्षकांच्या मनं जिंकली. त्यांनी काही चित्रपटांमध्ये साधी, सोज्वळ भूमिकाही साकारली पण त्यांना खलनायिकेच्या भूमिकांतूनच खरी ओळख मिळाली.

ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ मध्ये येवल्याचे लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला. अगदीच वयाच्या ९ व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली.

उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या उत्कृष्ट गायिका देखील होत्या.१९२८ च्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटातून कलाविश्वात पाऊल ठेवलं.‘रामायण’ मालिकेत ‘मंथरे’चं पात्र अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलं होतं.

१९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत-ए-मर्दा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाचं चांगलंच कौतुक झालं.

दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याबरोबर ललिता यांचा पहिला विवाह झाला. त्यानंतर त्यांनी एकत्र सात-आठ चित्रपटही केलं होतं. मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी राजा गुप्ता यांच्यासोबल लग्नगाठ बांधली.

अखेरच्या दिवसांत ललिता पवार कर्करोगाने त्रस्त होत्या. शेवटच्या घटका मोजताना त्या घरी एकट्याच होत्या. मृत्यूच्या तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता.

ललिता पवार यांना १९६१ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, १९७७ साली ‘महाराष्ट्र राज्य पुरस्करा’ने गौरविण्यात आलं.