२१ वर्षांच्या करिअरमध्ये सुपरफ्लॉप ठरली अभिनेत्री! कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांना देते टक्कर, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:38 IST2025-08-06T17:18:10+5:302025-08-06T17:38:18+5:30
पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या ही अभिनेत्री लग्न करुन गायब झाली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तिने कमबॅक केलं.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री जिने २१ वर्षांच्या करिअरमध्ये फक्त ५ चित्रपट केले. पद्यावर ही अभिनेत्री फ्लॉप ठरली पण कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना टक्कर देते. या अभिनेत्रीचं नाव दिव्या खोसला कुमार आहे.
दिव्या खोसलाने वयाच्या १८ व्या वर्षी मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर तिने २००४ मध्ये 'लव्ह टुडे' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
त्यानंतर अक्षय कुमार स्टारर 'अब तुम्हारे हवाले वतन साथीयो' या चित्रपटात दिव्याला मुख्य भूमिकेसाठी संधी मिळाली. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
याच चित्रपटादरम्यान, दिव्याची भेट टी सीरीजचे मालक भूषण कुमार यांच्यासोबत झाली. मग त्यांच्या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मग प्रेमकहाणी सुरू झाली. त्यानंतर दिव्या आणि भुषण कुमार यांनी लग्न केलं.
लग्नानंतर अभिनेत्री या क्षेत्रातून गायब झाली. परंतु बऱ्याच वर्षानंतर तिने इंडस्ट्रीत कमबॅक केलं. पण, तेव्हाही अभिनेत्रीला पाहिजे तसा स्टारडम मिळाला नाही.
२००५ मध्ये भूषण कुमारशी लग्न केल्यानंतर दिव्याने अभिनयापासून दूर राहून चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. सध्याच्या घडीला दिव्या खोसला कुमार ही सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माती म्हणून ओळखली जाते.
दिव्या खोसला तिच्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी श्रीमंतीच्या बाबतीत ती कोणाच्याही मागे नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दिव्याची एकूण संपत्ती सुमारे २०६ कोटी आहे.