चित्रपट पाहिला अन् फॅन वेडाच झाला, रक्ताने लिहिलेलं पत्र पाठवलं! अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:38 IST2025-09-24T16:28:45+5:302025-09-24T16:38:31+5:30

सिनेमा पाहून 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी चाहत्याने रक्ताने लिहिलेलं पत्र, स्वत:च सांगितला 'तो' भीतीदायक अनुभव

बॉलिवूडमधील देखण्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून अमृता राव ओळखली जाते.

९० च्या दशकात या सालस आणि सोज्वळ नायिकेच्या चित्रपटांसह अभिनयालाही चाहत्यांकडून दाद मिळाली.

अमृताने आजवर 'मैं हू ना', 'ईश्क विश्क' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'विवाह' चित्रपटामुळे ती आजही ओळखली जाते.या चित्रपटातून तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.

सध्या ही अभिनेत्री 'जॉली एलएलबी ३' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच अभिनेत्रीने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.त्यादरम्यान, तिने विवाह चित्रपट प्रदर्शित झाल्यावनंतर तिला एका चाहत्याने चक्क रक्ताने लिहिलेंल पत्र पाठवलं होतं.

तो किस्सा सांगताना अमृता म्हणाली, "विवाह प्रदर्शित झाल्यानंतर मला अनेक एनआरआय मुलांची स्थळं यायला लागली होती. लोक चक्क माझ्या घराबाहेर उभे राहून म्हणायचे माझ्याशी लग्मन कर. ते सगळं चित्र पाहून मला खूप हसायला यायचं."

पुढे अमृता म्हणाली, "इतकंच नाहीतर काहींनी मला पत्र देखील लिहिली होती. एकदा मला रक्ताने लिहिलेलं पत्रं आलं होतं, ते पाहून मला भीती वाटली होती."असा खुलासा अमृताने मुलाखतीत केला.

अमृता रावचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. इतक्या वर्षानंतरही तिची क्रेझ काही कमी झालेली नाही.