Ananya Panday : फॅशन का ये है जलवा! अनन्या पांडेचा अतरंगी लूक; फोटो पाहताच लोकांना आली उर्फीची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 03:46 PM2024-02-09T15:46:37+5:302024-02-09T16:37:35+5:30

Ananya Panday : अनन्याचे या लूकमधले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अनन्या पांडेने इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती नेहमीच तिच्या दमदार भूमिकेमुळे आणि तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असते. आता ती तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे.

अनन्याचे या लूकमधले फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. युजर्स तिची तुलना थेट उर्फी जावेदशी करू लागले आहेत. अनन्या पांडे तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

सोशल मीडियावरही अभिनेत्रीने तिच्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अनन्याच्या या पोस्टवरून चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ते तिची तुलना उर्फी जावेदशी करत आहेत.

अनन्याने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा विचित्र लूक पाहून सगळेच हैराण झाले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये, तिने ड्रॅगनफ्लाय टॉप घातला आहे.

पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करणाऱ्या अनन्या पांडेने तिच्या इंटरनॅशनल रनवे डेब्यूमधून काही फोटो फॅन्ससह शेअर केले आहेत. पॅरिस हाउते कॉउचर वीक 2024 मध्ये ही अभिनेत्री डिझायनर राहुल मिश्राची शोस्टॉपर बनली.

रॅम्पवर चालणारी ती सर्वात तरुण बॉलिवूड अभिनेत्री ठरली. मात्र, तिने परिधान केलेल्या ड्रेसने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत.

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप जास्त एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या अदांवर चाहते फिदा होतात.

अनन्या लवकरच विक्रमादित्य मोटवाने दिग्दर्शित सायबर-थ्रिलर 'कंट्रोल'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'कॉल माय बे' आणि अक्षय कुमार स्टारर 'शंकारा' या चित्रपटातही दिसणार आहे.