'मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला..', तनुश्री दत्ताचा पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:45 AM2022-09-23T11:45:21+5:302022-09-23T11:48:00+5:30

Tanushree Dutta : तनुश्री दत्ता २०२० साली हॅशटॅग मीटू चळवळीमुळे चर्चेत आली होती. पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता कायमच चर्चेत येत असते. आशिक बनाया आपने या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. मात्र ती बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली नाही.

तनुश्री दत्ता २०२० साली हॅशटॅग मीटू चळवळीमुळे चर्चेत आली होती. यावेळी तिने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केला होता.

आता तनुश्री दत्ताने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक खुलासा एका मुलाखतीत केला आहे. कनेक्ट एफएम कनडाला तनुश्री दत्ताने दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

तनुश्री दत्ताने ती उज्जैनमध्ये असताना घडलेल्या घटनेचाही यावेळी उल्लेख केला. मी उज्जैनमध्ये असताना माझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. याचदरम्यान माझ्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता.

या अपघातात मला गंभीर दुखापत झाली होती. रक्तस्राव झाल्याने मला यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागला होता”, असं तनुश्री म्हणाली.

काही महिन्यांपूर्वी तनुश्रीने तिच्याबरोबर घडणाऱ्या घटनांसाठी नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते.

जर माझ्याबरोबर काही अघटित घडलं तर त्यासाठी नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील त्यांचे मित्र जबाबदार असतील, असेही ती म्हणाली होती.