Cannes 2021: कान्सच्या रेड कार्पेटवर एमी जॅक्सनचा जलवा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 06:19 PM2021-07-16T18:19:47+5:302021-07-16T18:28:17+5:30

Cannes 2021: ब्रिटीश वंशाची बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे कान्स फिल्म फेस्टिवल.

ब्रिटीश वंशाची बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे कान्स फिल्म फेस्टिवल.

कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड नट्या यंदा दिसल्या नाहीत. अशात एमी कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

बरगंडी रंगाच्या बॉलगाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर उतरली. तिचा हा लुक आणि या लुकचे फोटो क्षणात इंटरनेटवर व्हायरल झालेत.

एक घेरदार गाऊन, आॅफ शोल्डर स्टाईल कोरसेट आणि यावर हि-यांचे दागिने असा तिचा लुक सर्वांनाचा भावला.

एमीच्या करिअर बद्दल म्हणाल तर 2010 मध्ये तिने करिअरची सुरूवात केली होती. सिनेमात तिने राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

त्यानंतर एमी सिंग इज ब्लिंग , फ्रीकी अली. 2.0 या सिनेमांमध्ये दिसली होती.

एमी ही एका मुलाची आई आहे. 2019 साली तिने मुलाला जन्म दिला होता.

एकेकाळी एमी व प्रतीक बब्बर यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सलमान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले होते.

Read in English