लहानपणीच वडिलांनी सोडली साथ, कॉल सेंटरमध्ये केलं काम; अभिनेत्रीचं असं बदललं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:03 PM2024-05-14T14:03:26+5:302024-05-14T14:12:11+5:30

आज अभिनेत्री 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

मनोरंजनसृ्ष्टीत प्रत्येकाच्याच संघर्षाची वेगवेगळी कहाणी आहे. कोणी बरेच कष्ट घेऊन इथपर्यंत पोहोचलंय तर कोणी करिअरसाठी घरदारही सोडलंय. अशाच एका अभिनेत्रीची ही कहाणी आहे.

या अभिनेत्रीला सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. कतरिना कैफ सारखी दिसते म्हणत तिच्यावर कतरिनाची ड्युप्लिकेट असा ठपका लागला. ही अभिनेत्री आहे जरीन खान(Zareen Khan).

जरीन खान आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ती मुंबईत पठाण कुटुंबात जन्माला आली. रिज्वी कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं. टीनएजमध्येच तिचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जरीनने कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

कॉल सेंटरमध्ये काम करता करता ती अनेक ब्रँड्ससाठी मॉडेल शूट करायची. तिला खरंतर एअरलाईन्समध्ये काम करण्याची इच्छा होती. मात्र जरीनचं वजन तेव्हा जवळपास १०० किलो होतं त्यामुळे ती रिजेक्ट व्हायची.

जरीनने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. 2005 साली ती युवराज सिनेमाच्या सेटजवळ पोहोचली. याच ठिकाणी सलमान खानने तिला पाहिलं. नंतर तिला ऑफिसमध्ये बोलावलं. 2009 साली तिला 'वीर' सिनेमासाठी साईन करण्यात आलं. हा सिनेमा फ्लॉप झाला पण जरीन सलमानच्या गटात आली.

यानंतर जरीनने 'हेट स्टोरी 4', 'अक्सर 2', '1921', 'वजह तुम हो' सह अनेक सिनेमे केले. मात्र तिला फारसं यश मिळालं नाही.

म्हणून ती पंजाबी इंडस्ट्रीकडे वळली. तिथे ती अनेक सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत आहे.

जरीन आज मेहनतीच्या बळावर आई आणि बहिणीसोबत आनंदात राहत आहे. आईसोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

जरीन सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असून तिचे 16 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने मेहनतीच्या जोरावर चांगली संपत्ती तयार केली आहे. माध्यम रिपोर्टनुसार तिच्याकडे ३७ कोटींची संपत्ती आहे.