वयाच्या १७ वर्षी पदार्पण, सतत मिळालं रिजेक्शन; लग्नानंतर 'या' अभिनेत्रीचं नशीबच पालटलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 11:51 AM2024-04-18T11:51:55+5:302024-04-18T11:59:04+5:30

समुद्रकिनारी १०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट; कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे ही अभिनेत्री

नशीब ही अशी गोष्ट आहे जी कधी पालटेल सांगता येत नाही. मनोरंजन क्षेत्रात तर असे अनेक कलाकार आहेत जे रातोरात स्टार झालेत. अशीच एक अभिनेत्री आहे जिने करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला पण आज ती वयाच्या 48 व्या वर्षी कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे.

सिल्व्हर स्क्रीनवर आपल्या सौंदर्याची जादू दाखवणारी ही अभिनेत्री आहे शिल्पा शेट्टी. शिल्पाने वयाच्या 17 व्या वर्षी फिल्मइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. उंच, कमनीय बांधा आणि सौंदर्य यामुळे ती इतर अभिनेत्रींना टक्कर देणारी होती. तिचे अनेक आयटम साँगही गाजले.

शिल्पाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेक निर्मात्यांकडून तिला रिजेक्शन मिळाले. इतकंच नाही तर तिने नाकाची सर्जरी केली यावरुनही तिच्यावर टीका झाली.

शिल्पाने बिग ब्रदर शोमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा इतर स्पर्धकांनी तिच्यासोबत भेदभाव केला होता. हे सर्व झेलणं तिच्यासाठी इतकं सोपं नव्हतं असं एका मुलाखतीत म्हणाली होती.

मात्र शिल्पाने निराश न होता सर्व संकटांचा सामना केला. तिने काही सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवलीही.'धडकन' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली.

काही वर्षातच इंडस्ट्रीनेही शिल्पाची दखल घेतली. तिला एक स्वतंत्र महिला, बिझनेसवुमन म्हणून ओळख मिळाली. पुढे राज कुंद्राशी लग्न केल्यानंतर तिचं नशीबच पालटलं.

शिल्पा आणि राज कुंद्रा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वियान आणि समिशा अशी त्यांची नावं आहेत. शिल्पा योगामध्ये माहीर आहे. तिच्या योगासनांचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. इतर महिलांसाठी ती प्रेरणादायी आहे.

आज शिल्पाकडे प्रायव्हेट जेट आहे. शिवाय मुंबईत रेस्टॉरंट्स आहेत. दुबईत तिचा एक फ्लॅट आहे. तसंच १०० कोटींचा समुद्रकिनारी एक बंगला आहे. अशा प्रकारे तिची कोट्यवधींची संपत्ती आहे.