नयनरम्य... अद्भुत... अभिनेत्रीनं अनुभवलं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचे भव्य सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:57 IST2025-10-13T15:39:21+5:302025-10-13T15:57:49+5:30
नुसरत भरुचानं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याला भेट दिली आणि खास फोटो शेअर केले.

बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे नुसरत भरूचा (Nushrat Bharucha). सध्या अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
नुकतंच नुसरत भरुचानं जगप्रसिद्ध नायगारा धबधब्याचे सौंदर्य अनुभवलं आहे.
तिने नायगारा धबधब्याचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
नायगारा धबधबा अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर निआग्रा नदीवर स्थित आहे.
हा धबधबा जगभरात आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी परिचीत आहे. नुसरतने या धबधब्याचे भव्य आणि विस्मयकारक सौंदर्य खूप जवळून अनुभवले.
धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याच्या तुषार आणि त्यातून निर्माण झालेल्या इंद्रधनुष्याच्या दृश्याने ती भारावून गेल्याचे तिच्या फोटोंमधून स्पष्ट होते.
या धबधब्यात सगळ्यात उंचीवरून पाणी पडताना पाहणे म्हणजे पर्वणीच असते.
याच्या एका बाजूला अमेरिका आहे तर, दुसऱ्या बाजूला कॅनडा आहे. हा धबधबा दोन्ही देशांना जोडलेला आहे.
नुसरत भरुचानं शेअर केलेले हे नयनरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्वीटी, छोरी २ अशा गाजलेल्या सिनेमात नुसरतनं काम केलं आहे.