आतून इतके झक्कास आहे अनिल कपूरचे घर, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 14:47 IST2020-07-23T14:39:46+5:302020-07-23T14:47:17+5:30
अनिल कपूरच्या शानदार बंगल्याचे इनसाईड फोटो

अनिल कपूरच्या घराचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अनिल कपूर करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक असून त्याचा स्वत:चा आलिशान बंगला आहे.
अनिल कपूरचे घरावर खास प्रेम आहे. या घराचे इंटेरियर त्याच्या पत्नीने केले आहे.
या घरात तो पत्नी सुनीता, मुलगी रिया व मुलगा हर्षवर्धनसोबत राहतो. सोनम कपूरही याच घरात राहायची. पण आता ती लग्न होऊन सासरी गेलीये.
पत्नी सुनीताने तिच्या व अनिलच्या आवडीनुसार हे घर सजवले आहे. ते सजवताना प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे.
घरातील बेडरूम, लिव्हिंग एरिया, सीटिंग एरिया शानदार आहे.
या घरातील लॉबीमध्ये भगवान बुद्धांची ही मूर्ती आहे. अशा अनेक कलात्मक वस्तूंनी घर सजवलेले आहे.
घरांच्या भींतींवर वेगवेगळ्या, महागड्या पेन्टिंग्स आहेत.
अनिल कपूर जिथे कुठे जातो तिथून घराच्या सुशोभिकरणासाठी लागणा-या वस्तू आठवणीने घेऊन येतो.
अनिल यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात उमेश मेहरा यांचा १९७९ मध्ये आलेल्या हमारे तुम्हारे या चित्रपटांमधून केली होती. या चित्रपटांमधून ते एका सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले होते.
१९८३ साली आलेल्या वो सात दिन या चित्रपटांमधून त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.त्यानंतर अनिल कपूरच्या करियरला नवी कलाटणी मिळाली.
त्यानंतर त्याने स्लमडॉग मिलेनियर ,सलाम -ए- इश्क ,बेवफा ,अरमान, नायक, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, दिल धडकने दो, वेलकम, तेजाब, घर हो तो ऐसा या चित्रपटांमध्ये काम केले आहे.