Hotness Overloaded!!! अमृता खानविलकरचा हा बिकनी लूक पाहून व्हाल तुम्ही घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 19:42 IST2019-07-08T19:35:13+5:302019-07-08T19:42:54+5:30

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रीय असते.
अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी अपडेट देत असते.
अमृता सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे.
अमृता एकटी मालदीवला गेली नसून तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली खरे व तिची आईदेखील गेली आहे.
सध्या इंस्टाग्रामवर अमृताचे मालदिवमधील फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे.
अमृताचे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. सध्या तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
अमृताने बिकनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच हॉट व ग्लॅमरस दिसतेय.
अमृताचा हा बिकनी लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
अमृता खानविलकरच्या अभिनय आणि नृत्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे.