जेठालाल, भिडेच्या तारक मेहताने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा

By Admin | Updated: August 8, 2016 12:10 IST2016-08-08T11:59:20+5:302016-08-08T12:10:32+5:30

'गोकुळधाम' सोसायटी म्हणून प्रेक्षकांना माहिती असलेल्या सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उलट चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने दोन हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे.

Phase of 2 thousand episodes crossing Jethalal, Bheide's Tarak Mehta | जेठालाल, भिडेच्या तारक मेहताने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा

जेठालाल, भिडेच्या तारक मेहताने ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ८ - 'गोकुळधाम' सोसायटी म्हणून प्रेक्षकांना माहिती असलेल्या सब टीव्हीवरील 'तारक मेहता का उलट चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने दोन हजार एपिसोडचा टप्पा पार केला आहे. त्यामुळेच आजही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. अय्यर, सोढी, मेहता, भिडे, गडा ही कुटुंब प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटतात. प्रेक्षकांना खळखळून हसवताना या मालिकेने नेहमीच आपले सामाजिक भान जपले आहे. 
 
देशातील फक्त ही सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका नसून,  सर्वाधिक एपिसोड पूर्ण करणारी मालिका आहे. आज आमच्या वाहिनीवर ही मालिका सुरु आहे ही अभिमानाची बाब आहे. हा एक सुखद प्रवास आहे असे सब टीव्हीचे बिझनेस हेड अनूज कपूर यांनी सांगितले. 
 
काहीशे एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतर मालिकेचा वेग मंदावतो. प्रेक्षकांची रुची कमी होते. पण हजार एपिसोडचा टप्पा पार केल्यानंतरही प्रेक्षकांची या मालिकेतील रुची अजिबात कमी झालेली नाही. या मालिकेचे सुरुवातीला प्रसारीत झालेले भाग आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवतात हे या मालिकेचे यश आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारीत झाला त्यानंतर आज आठवर्ष ही मालिका आपला प्रेक्षक टिकवून आहे. 
 

Web Title: Phase of 2 thousand episodes crossing Jethalal, Bheide's Tarak Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.