फाल्गुनीने उमेश आणि स्पृहाचे केले कौतुक!
By Admin | Updated: May 21, 2017 02:58 IST2017-05-21T02:58:01+5:302017-05-21T02:58:01+5:30
उमेश कामत आणि स्पृहा जोशी ‘डोन्ट वरी बी हॅपी’ या नाटकात काम करत आहेत. या नाटकाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. या नाटकातील उमेश कामत आणि

फाल्गुनीने उमेश आणि स्पृहाचे केले कौतुक!
उमेश कामत आणि स्पृहा जोशी ‘डोन्ट वरी बी हॅपी’ या नाटकात काम करत आहेत. या नाटकाचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या नाटकातील त्या दोघांच्या जोडीचे देखील चांगलेच कौतुक होत आहे. या नाटकाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. मराठी नाटकाला गेल्या काही दिवसांमध्ये खूप चांगले दिवस आले आहेत. मराठी नाटकांकडे प्रेक्षक वळले आहेत. नाटकांमध्ये देखील विविध विषय हाताळताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकदेखील आवर्जून नाट्यगृहात नाटक पाहायला जात आहेत. गायिका फाल्गुनी पाठकने आजवर अनेक प्रसिद्ध गाणी गायली आहेत. फाल्गुनीला मराठी नाटके पाहायला खूप आवडतात. ती नुकतीच "डोन्ट वरी बी हॅपी" हे नाटक पाहायला गेली होती. हे नाटक तिला खूपच आवडले. या नाटकातील उमेश आणि स्पृहाच्या अभिनयाची तर ती चाहती झाली आहे. तिने ट्विटर ट्वीट करून या दोघांचे कौतुक केले आहे. तिने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘स्पृहा मला तुझे काम खूपच आवडले. उमेशचे ट्विटर हँडल मिळत नसल्याने माझा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचव. हे ट्वीट पाहून उमेश खूपच खूश झाला आहे. त्याने ट्वीट करून त्याला खूप चांगले सरप्राइज मिळाले असल्याचे म्हटले आहे आणि या ट्वीटसाठी फाल्गुनीचे आभारदेखील मानले आहेत.’