‘हैदर’नंतर लोक मला परिपक्व म्हणतील
By Admin | Updated: August 26, 2014 02:21 IST2014-08-26T02:21:00+5:302014-08-26T02:21:00+5:30
अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर लवकरच ‘हैदर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘हैदर’नंतर लोक मला परिपक्व म्हणतील
अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर लवकरच ‘हैदर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘तीन पत्ती’सारख्या सुपरफ्लॉप चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रद्धाचा हा पाचवा चित्रपट आहे. ‘आशिकी-२’ आणि ‘एक विलेन’ हे तिचे दोन चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. ‘हैदर’मध्ये काम करून आत्मिक शांती मिळाल्याचे श्रद्धाचे म्हणणे आहे. ती म्हणाली, ‘हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक मला परिपक्व अभिनेत्री मानतील. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान मानते’. विशाल भारद्वाजचे दिग्दर्शन असलेला ‘हैदर’ हा चित्रपट शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकाचे फिल्मी रूपांतर आहे. चित्रपटात शाहीदसोबत श्रद्धा कपूर, के. के. मेनन, तब्बू आणि इरफान खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात शाहीद त्याच्या वडिलांचा शोध घेताना दिसेल. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग काश्मीरमध्ये झाले आहे. चित्रपटातील शाहीदचा लूक आणि कलाकार मुख्य आकर्षण आहेत. हा चित्रपट येत्या २ आॅक्टोबरला रिलीज होत आहे.