लखपती नवरा, करोडपती नवरी! परिणीती चोप्रा - राघव चड्ढांची आता एकूण संपत्ती किती?...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 19:39 IST2023-09-24T19:30:35+5:302023-09-24T19:39:22+5:30
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो अद्याप आलेले नाहीत. चाहते त्यांच्याच पहिल्या झलकची वाट पाहत आहेत.

लखपती नवरा, करोडपती नवरी! परिणीती चोप्रा - राघव चड्ढांची आता एकूण संपत्ती किती?...
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा हे आज एकमेकांचे झाले आहेत. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये जोडपे विवाहबद्ध झाले आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो अद्याप आलेले नाहीत. चाहते त्यांच्याच पहिल्या झलकची वाट पाहत आहेत.
परिणीती आणि राघव चड्ढा यांनी सात फेरे घेतले आहेत. कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून वधू-वरांची छायाचित्रे क्लिक करण्यात येत आहेत. निरोप देताना 'धडकन' चित्रपटातील 'दुल्हे का सेहरा' हे गाणे वाजवले गेले आणि त्यानंतर 'तेनू लेके में जावंगा' गाण्यावर परिणीतीने निरोप घेतला.
या लग्नाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार राघवकडे त्यावेळी फक्त 30 हजार रुपये रोख होते. त्यावेळी आप नेत्याची जंगम मालमत्ता 37 लाख रुपये होती. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांनी 2.44 लाख रुपये उत्पन्न दाखवले होते. तर फोर्ब्स इंडियानुसार, 2019 मध्ये परिणीतीची कमाई 12.5 कोटी रुपये होती. फोर्ब्स इंडियामध्ये त्याच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून चित्रपट आणि जाहिरातींचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आता फायनान्शियल एक्स्प्रेस सारख्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये आहे.