Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:40 IST2025-07-01T13:39:43+5:302025-07-01T13:40:27+5:30

Shefali Jariwala’s Postmortem Report : शेफाली जरीवालाच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ४२ वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. तिचे निधन कशामुळे झाले, तिला खरोखर हार्ट अटॅक आला का, की तिच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे.

"Parag Tyagi will have to go for questioning", Shefali Jariwala's friend Pooja Ghai made revelations about the post-mortem report, said - "Something is wrong.." | Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."

Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."

शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)च्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. वयाच्या ४२ वर्षी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. तिचे निधन कशामुळे झाले, तिला खरोखर हार्ट अटॅक आला का, की तिच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. तिच्या मृत्यूनंतर अंबोली पोलिसांची टीम तपास करत आहेत. त्यांच्या घरी फॉरेंसिक टीमदेखील गेली होती. पोलिसांनी जवळपास मित्र, नोकर आणि पराग असे एकूण १४ लोकांचे स्टेटमेंट घेतले आहेत. आता तिचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्याचा खुलासा तिची मैत्रिण आणि अभिनेत्री पूजा घई(Pooja Ghai)ने केला आहे. तिने अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

शेफाली जरीवालाची खास मैत्रीण पूजा घईने विकी लालवानीला मुलाखत दिली, ज्यात तिने अभिनेत्रीबद्दल माहिती दिली. यावेळी पूजाला विचारण्यात आलं की, प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय समोर आले आहे. त्यावर पूजा म्हणाली की, चांगली बाब ही आहे की, यात काहीच गडबड नाही. माझी सर्वात मोठी चिंता होती की परागला पोलीस तपासातून जावे लागेल, जे त्याच्यासाठी खूप कठीण जाईल. कारण तो आधीपासून दुःखी आहे आणि एकटे राहायचे आहे. पण त्याला पोलीस चौकशीचा सामना करावा लागेल.

''पराग लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर पडावा''

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ''पोलीस आपले काम करत होती मात्र मागील काही प्रकरणं पाहिली. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. मात्र काही सेलिब्रेटी या सर्वातून गेले आहेत. त्यांना कित्येक महिने चौकशी आणि मीडियाच्या नजरेसमोर राहावे लागते. ज्यात त्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो आणि त्यांना दुःख करायलाही वेळ मिळत नाही. कारण ते सातत्याने पोलीस आणि मीडियाच्या नजर कैदेत राहतात. असेच काही महिने निघून जातात. त्यावेळी माझी हीच प्रार्थना होती की, पराग लवकरात लवकर या परिस्थितीतून बाहेर पडावा. कारण तो स्वतःसाठी वेळ काढू शकेल.''

''त्यात काहीच गडबड नाही''

पूजा पुढे म्हणाली की, आभारी आहे की प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमधून हे स्पष्ट झाले की, त्यात काहीच गडबड नाही. नोकर आणि पराग दोघांनाही सोडलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा नोकराला पाहिलं तेव्हा मला वाटलं की बिचाऱ्याला कदाचित काही माहित असेल. मात्र पोलिसांना आपलं काम करावं लागतंच. मात्र त्यांना दुसऱ्यांच्या भावना समजत नाही. देवाच्या कृपेने सर्व ठीक झाले आणि नोकर व परागला सोडून दिले. आता दोन आठवड्यात आपल्याला समजेल की शेफालीसोबत प्रत्यक्षात काय घडले होते.

Web Title: "Parag Tyagi will have to go for questioning", Shefali Jariwala's friend Pooja Ghai made revelations about the post-mortem report, said - "Something is wrong.."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.