पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाची आठवण छातीवर कोरली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 14:35 IST2025-08-17T14:34:01+5:302025-08-17T14:35:09+5:30

पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफालीच्या चेहऱ्याचा छातीवर काढला टॅटू, व्हिडीओ होतोय व्हायरल

Parag Tyagi Makes Tattoo Remembering Late Wife Shefali Jariwala Video Viral | पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाची आठवण छातीवर कोरली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पराग त्यागीने दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाची आठवण छातीवर कोरली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस १३' मधील स्पर्धक शेफाली जरीवालानं . २७ जून रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना आणि कलाविश्वातील अनेकांना मोठा धक्का बसला. शेफाली जरीवालाच्या अचानक निधनानंतर तिचा पती अभिनेता पराग त्यागी पूर्णपणे तुटून गेला होता. पत्नी शेफालीच्या निधनानंतर पराग त्यागीनं तिची आठवण कायम ठेवण्यासाठी एक खास पाऊल उचललं. त्याने आपल्या छातीवर दिवंगत पत्नी शेफाली जरीवालाच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.

पराग त्यागीने त्याच्या छातीवर शेफालीच्या चेहऱ्याचा टॅटू बनवला आहे. व्हिडीओमध्ये पराग त्यागी टॅटू काढून घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, अलिकडेचे परागनं तो शेफालीची शेवटची इच्छा पुर्ण करत असल्याचं सांगितलं होतं.  १२ ऑगस्टला शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांच्या लग्नाचा ११ वा वाढदिवस होता. या खास दिवसानिमित्त त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तो मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक फाउंडेशन उघडत असल्याचं सांगितलं.


कोण आहे शेफाली जरीवाला?
शेफाली जरीवाला हिचा जन्म १५ डिसेंबर१९८२ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. शेफाली जरीवाला अनेक शो, चित्रपट, गाण्यांचे अल्बममध्ये दिसून आली होती. नच बलिए ५ आणि नच बलिए ७ मध्येही शेफाली जरीवालाने सहभाग घेतला होता. २०१९ मध्ये बिग बॉस १३ मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती.  शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न २००४ मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१५ मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.

Web Title: Parag Tyagi Makes Tattoo Remembering Late Wife Shefali Jariwala Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.