'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:27 IST2025-06-30T14:27:13+5:302025-06-30T14:27:36+5:30

सानविका म्हणाली, "मेकर्सने मला त्या सीनबद्दल..."; या कारणामुळे रिंकीने दिला नकार

panchayat season 4 sanvikaa denies to do kissing scene with jitendra kumar aka sachiv ji | 'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

ओटीटीवर 'पंचायत सीझन ४' (Panchayat 4)आला आहे. सगळीकडे या सीझनची चर्चा आहे. फुलेरा मधली निवडणूक, प्रल्हाद चा ला आमदारकीची ऑफर, सचिवची-रिंकीची लव्हस्टोरी पुढे जाणं असं सगळंच खूप सुंदररित्या दाखवलं आहे. एका सीनमध्ये सचिवजी आणि रिंकी यांच्यात थोडी जवळीकही दाखवली आहे. तो खरं तर किसींग सीन दाखवण्याचा मेकर्सचा प्लॅन होता. मात्र रिंकी म्हणजेच अभिनेत्री सानविकाने (Sanvikaa) किसींग सीन द्यायला नकार दिला होता. सानविकानेच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

'जस्ट टू फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सानविका म्हणाली, "पहिल्यांदा जेव्हा स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा मेकर्सने मला किसींग सीनविषयी काहीही सांगितलं नव्हतं. नंतर या सीझनचा दिग्दर्शक अक्षत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, 'तुझ्याशी बोलायचं आहे'. मी म्हणाले, 'बोल ना, काय झालं?'. तर तो म्हणाला, 'या सीझनमध्ये एक किसींग सीन असावा अशी मेकर्सची इच्छा आहे. रिंकी गाडीवरुन जात असते आणि ती पडते. तेव्हा त्यांच्यात किस होतं असा असा तो सीन होता. मी म्हटलं की मला विचार करायला दोन दिवस हवे आहेत. मी विचार केला आणि मला वाटलं की पंचायतचे फॅमिली ऑडियन्स आहेत. त्यांना हे कसं वाटेल? मग मी त्यांना नकार दिला."

"नंतर सेटवर शूट करताना तो सीन हटवला गेला. पण मग त्यांनी तो पाण्याची टाकीवाला सीन ठेवला. ज्यात आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ येतो असं दाखवलं आहे. आपण हे चुकीच्या पद्धतीने दाखवणार नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण ते करताना थोडं विचित्र वाटतंच. पण जितू खूप चांगला आहे. त्याने मला कंफर्टेबल केलं. आम्ही मग शूटही त्याच पद्धतीने केलं ज्यात आम्ही किस करत नाही पण एकमेकांच्या जवळ येऊन किस केल्यासारखंच ते दिसतं."

Web Title: panchayat season 4 sanvikaa denies to do kissing scene with jitendra kumar aka sachiv ji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.