पहिल्या आठवडयात शाहरुखची भन्साळींवर मात
By Admin | Updated: December 21, 2015 16:43 IST2015-12-21T16:43:24+5:302015-12-21T16:43:24+5:30
शाहरुख खानच्या 'दिलवाले' आणि संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटात बॉक्सऑफीसवर अटीतटीची स्पर्धा सुरु आहे.

पहिल्या आठवडयात शाहरुखची भन्साळींवर मात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - शाहरुख खानच्या 'दिलवाले' आणि संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव-मस्तानी' चित्रपटात बॉक्सऑफीसवर अटीतटीची स्पर्धा सुरु आहे. पहिल्या आठवडयात दिलवालेने बाजी मारली असली तरी, पुढच्या आठवडयातही दिलवाले हेच सातत्य कायम टिकवणार का ? याची उत्सुक्ता आहे.
दिलवालेने संपूर्ण जगभरात १०० कोटींची कमाई केली आहे. एकटया भारतात या चित्रपटाने ६५ कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी २१ कोटी. दुस-या दिवशी २०.०९ कोटी आणि तिस-या दिवशी २४ कोटींची कमाई केली. दुस-या बाजूला 'बाजीराव-मस्तानी' उत्पनामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने १२.८० कोटी, दुस-या दिवशी १५.५२ कोटी आणि तिस-या दिवशी १८.४५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत ४६.७७ कोटींची कमाई केली आहे. शाहरुखची परदेशातील लोकप्रियता आणि जास्त थिएटर मिळाल्याचा फायदा दिलवालेला मिळाला. भव्य-दिव्यतेने हिंदी चित्रपटाचा पडदा व्यापणारा बाजीराव-मस्तानी या वर्षातील महागडा चित्रपट आहे.
१२० कोटी रुपये या चित्रपटाच्या निर्मितीवर खर्च आला आहे. एकाचदिवशी दोन्ही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे दोन्ही चित्रपटांना आर्थिकदृष्टया मोठा फटका बसला आहे.