मामि महोत्सवात पाकच्या चित्रपटांना विरोध

By Admin | Updated: October 17, 2016 03:49 IST2016-10-17T03:49:10+5:302016-10-17T03:49:10+5:30

१८ व्या मुंबई महोत्सवात पाकमध्ये चित्रीकरण करण्यात आलेला चित्रपट दाखविण्यास संघर्ष फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने विरोध केला

Opposition to Pakistani films at Mami Festival | मामि महोत्सवात पाकच्या चित्रपटांना विरोध

मामि महोत्सवात पाकच्या चित्रपटांना विरोध

मुंबई : १८ व्या मुंबई महोत्सवात पाकमध्ये चित्रीकरण करण्यात आलेला चित्रपट दाखविण्यास संघर्ष फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने विरोध केला आहे. जर हा चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास, तीव्र आंदोलन करून तो हाणून पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. २० ते २७ आॅक्टोबरमध्ये हा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये विविध देशांतील चित्रपटांबरोबरच ‘जागो हुवा सवेरा’ हा चित्रपट दाखविण्याचे आयोजकांचे नियोजन आहे. हा चित्रपट दाखवल्यास तीव्र निदर्शने केले जातील, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष पृथ्वी मस्के यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Opposition to Pakistani films at Mami Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.