‘फक्त एक रुपय्या!’

By Admin | Updated: June 11, 2017 03:02 IST2017-06-11T03:02:52+5:302017-06-11T03:02:52+5:30

बॉलिवूड म्हणजे जादुई दुनिया...प्रचंड पैसा, ग्लॅमर आणि नाव मिळवून देणारं एक मायाजाल... एक चित्रपट हिट झाला की, मग काय पैसाच पैसा. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात पैशांच्या

'Only one rupee!' | ‘फक्त एक रुपय्या!’

‘फक्त एक रुपय्या!’

- Aboli Kulkarni

बॉलिवूड म्हणजे जादुई दुनिया...प्रचंड पैसा, ग्लॅमर आणि नाव मिळवून देणारं एक मायाजाल... एक चित्रपट हिट झाला की, मग काय पैसाच पैसा. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात पैशांच्या मागे धावणारे अनेक कलाकार आपण पाहतो. पण, तुम्हाला हे माहितीय का, की असेही काही कलाकार ‘बी टाऊन’ मध्ये आहेत ज्यांनी अभिनय, माणुसकी, नातेसंबंध, मैत्री जपण्यासाठी चित्रपट करत असताना निर्मात्याकडून एक रुपयादेखील घेतला नाही. जाणून घ्या मग कोण आहेत हे कलाकार....

शाहीद कपूर
शाहीद कपूरला २०१५ मध्ये ‘हैदर’ या चित्रपटासाठी ‘फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड’ मिळाला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. पण, तुम्हाला माहितीय का, शाहीदने या चित्रपटासाठी एक रुपयाही घेतला नव्हता. ‘हैदर’ हा चित्रपट त्याच्यासाठी एक टर्निंग पॉर्इंट ठरला.

कॅटरिना कैफ
‘चिकनी चमेली’ कॅटरिना कैफ हिने करण जोहरच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात एक आयटम साँग केले होते. या गाण्यातील तिचा हॉट अंदाज सर्वांनाच प्रचंड भावला होता. या गाण्यासाठी तिने मेहनतही खूप केली होती. पण, तिने या गाण्यासाठी काहीही चार्जेस घेतले नव्हते.

प्रियांका चोप्रा
अभिनयाच्या बळावर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हिने ‘बिल्लू’ या चित्रपटात एका गाण्यात उत्कृष्ट काम केले आहे. यासाठी काम करताना ती म्हणाली,‘मी पैशांसाठी गाण्यात काम करीत नाही, तर केवळ शाहरुखसोबतच्या मैत्रीसाठी हे करीत आहे.’

राणी मुखर्जी
करण जोहर हा राणी मुखर्जीचा बेस्ट फ्रेंड आहे. करणचा चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ यात राणीने शाहरुखच्या लहानपणीच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. ती चित्रपटात फार कमी वेळा दिसत होती. त्यामुळे छोट्याशा भूमिकेसाठी तिने करणकडून कुठलेही चार्जेस घेतले नाहीत.

सोनम कपूर
मिल्खासिंगच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘भाग मिल्खा भाग’ हा उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. यात फरहान अख्तरसोबत सोनम कपूर काही थोड्या कालावधीसाठीच दिसली होती. मात्र, तिने या चित्रपटात काम करण्यासाठी अतिशय कमी म्हणजे केवळ ११ रुपयेच घेतले होते.

सोनाक्षी सिन्हा
खिलाडी अक्षयकुमारसोबत बऱ्याच चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. ‘बॉस’ या चित्रपटातील एका गाण्यात तिने अक्कीसोबत काम केले होते. यासाठी तिने काहीच पैसे घेतले नव्हते. तिने त्याच्यासोबत ‘रावडी राठौड’,‘जोकर’, ‘बेबी’ यासारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

दीपिका पादुकोण
‘ओम शांती ओम’ चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. या पहिल्याच चित्रपटापासून तिने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या चित्रपटासाठी शाहरुख खानसोबत काम करण्याचे तिने काहीच पैसे घेतले नव्हते. तिला वाटत होते, की पहिल्याच चित्रपटात शाहरपखसोबत काम करायला मिळणे ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी एक पैसाही आकारला नाही.

शाहरुख खान
‘भूतनाथ रिटर्न्स’ चित्रपटात शाहरुख खानने जेवढे काम केले, ते फ्री मध्ये केले होते. शाहरुख या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग होता. दुसऱ्या भागातील त्याच्या छोट्याशा भूमिकेसाठी त्याने कोणतेही चार्जेस घेतले नव्हते.

करिना कपूर
‘बिल्लू’ चित्रपटातील ‘मरजानी-मरजानी’ हे गाणं आठवतंय का? करिना कपूर खानने या गाण्यावर डान्स करण्यासाठी काहीच फी घेतली नव्हती. कारण हे शाहरुख खानच्या चित्रपटातील गाणे होते. या गाण्याचे शूटिंग झाल्यानंतर करिनाला एक चेक पाठविण्यात आला; मात्र तिने तो निर्मात्याला परत पाठवला.

Web Title: 'Only one rupee!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.