दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 07:21 PM2022-12-21T19:21:01+5:302022-12-21T19:26:42+5:30

Smita Gondkar : दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनी वादावर स्मिता गोंदकरने प्रतिक्रिया दिली आहे.

On Deepika's saffron bikini controversy, actress Smita Gondkar said - 'Now a saffron colored bra...' | दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...'

दीपिकाच्या भगव्या बिकिनी कॉन्ट्रोव्हर्सीवर अभिनेत्री स्मिता गोंदकर म्हणाली - 'आता भगव्या रंगाची ब्रा...'

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा पठाण (Pathaan Movie) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) हे गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज झाले. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून राजकीय वादाला तोंड फुटले. भगव्या रंगाच्या बिकिनीवर भाजपा आणि हिंदू संघटनाने आक्षेप घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाला आहे. आता या वादात अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) हिने उडी घेतली आहे. यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री स्मिता गोंदकरने नुकतेच सकाळला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पदुकोण आणि तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, सध्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे, त्यामुळे मला खरंच भीती वाटू लागली आहे. हे सर्व प्रकरण बघितल्यानंतर सर्वप्रथम मी माझं वॉर्डरोब पाहिले. त्यात माझ्याकडे बिकिनी कलेक्शनमध्ये भगव्या रंगाचे काही आहे की नाही, याची खात्री केली. मला तर आता भगव्या रंगाची ब्रा परिधान करायलाही भीती वाटते आहे. चुकून कोणाच्या नजरेला पडली तर ही लोक आपले काय करतील, याचा विचार करुनही भीती वाटते.  


ती पुढे म्हणाली की, सध्या ज्या भगव्या रंगाच्या बिकनीवरून वाद सुरु आहे, हा हिंदू धर्माचा पवित्र रंग म्हणून बोलले जात आहे, तर मग मी दीपिकाला याबद्दल एक सल्ला देईन की तिनं सरळ हिरव्या रंगाच्या हॉट बिकिनी परिधान करावी आणि त्यानंतर स्वतःचा फोटो पोस्ट करावा म्हणजे प्रश्नच मिटेल. खरेतर आता जग पुढे चालले आहे. जागतिकीकरणामुळे वेस्टर्न संस्कृतीचा पगडा वाढतो आहे, पण त्याहूनही अधिक आता आपण हवामानात बदल होत आहे. मग हा तर चित्रपट आहे. जो जागतिक स्तरावर पाहिला जातो. चित्रपटातील प्रसंगाची गरज ओळखून कलाकारांना कपडे घालावे लागतात आणि जर ते त्यात सुंदर दिसत असतील तर त्यांनी ते का घालू नयेत? जर ते चांगले दिसले नसते, तर प्रश्न वेगळा होता, पण उगाचच दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन जो वाद सुरु आहे तो मला काही पटलेला नाही.

Web Title: On Deepika's saffron bikini controversy, actress Smita Gondkar said - 'Now a saffron colored bra...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.