चित्रपटाच्या ट्रेड २ मध्ये आता दगडी चाळ २
By Admin | Updated: January 29, 2016 02:32 IST2016-01-29T02:32:27+5:302016-01-29T02:32:27+5:30
टाइमपास २, मुंबई-पुणे-मुंबई २ अशा मराठी चित्रपटांच्या ट्रेड २ मध्ये आता ‘दगडी चाळ २’ चित्रपटानेदेखील उडी मारली आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते. पहिल्या चित्रपटाला

चित्रपटाच्या ट्रेड २ मध्ये आता दगडी चाळ २
टाइमपास २, मुंबई-पुणे-मुंबई २ अशा मराठी चित्रपटांच्या ट्रेड २ मध्ये आता ‘दगडी चाळ २’ चित्रपटानेदेखील उडी मारली आहे, अशी माहिती सूत्रांकडून कळते. पहिल्या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर त्याचा सीक्वेल करावा, अशी सध्या एक नवीन फॅशन बॉलीवूडसहित मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील रुजू होत आहे. हेच पाहा ना, अंकुश चौधरी व पूजा सावंत यांचा डॉन अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘दगडी चाळ’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटासारखा सीक्वेलला उशीर न करता ‘दगडी चाळ २’ची निर्मिती होत असल्याचे कळते. कदाचित, दगडी चाळ या चित्रपटाचा फीव्हर प्रेक्षकांना चढला आहे. तो असेपर्यंतच त्याचा सीक्वेल काढावा, असा विचार कदाचित दिग्दर्शकाने केला असावा, असे वाटते. असो. पण आता यानंतर तुम्ही विचारात असाल की, ‘दगडी चाळ २’ या चित्रपटातदेखील अंकुश चौधरी, पूजा सावंत व मकरंद देशपांडे हेच कलाकार असतील का? पण ही माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.