आता हुमा बनणार क्वीन

By Admin | Updated: September 20, 2014 23:46 IST2014-09-20T23:46:01+5:302014-09-20T23:46:01+5:30

कंगना राणावतच्या ‘क्वीन’ या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Now Queen becomes Huma | आता हुमा बनणार क्वीन

आता हुमा बनणार क्वीन

कंगना राणावतच्या ‘क्वीन’ या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. विकास बहलचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा रिमेक लवकरच तेलगू भाषेत बनवला जाणार आहे. या चित्रपटात हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सूत्रंनुसार या चित्रपटाची ऑफर याआधी काजल अग्रवालला देण्यात आली होती; पण तिने जास्त पैशांची मागणी केल्याने निर्मात्यांनी दुस:या अभिनेत्रीचा शोध सुरू केला. आता या चित्रपटासाठी ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ फेम हुमा कुरैशीला ऑफर मिळाल्याचे कळते. हुमालाही चित्रपट आवडला असून ती या भूमिकेबाबत उत्साही असल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.

 

Web Title: Now Queen becomes Huma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.