हार्डवर्कशिवाय पर्याय नाही!

By Admin | Updated: July 14, 2017 02:49 IST2017-07-14T02:49:06+5:302017-07-14T02:49:06+5:30

अभिनेत्री ऐश्वर्या सोनारने एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे

No hard work options! | हार्डवर्कशिवाय पर्याय नाही!

हार्डवर्कशिवाय पर्याय नाही!

- Aboli Kulkarni
अभिनेत्री ऐश्वर्या सोनारने एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. आता ती एका चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करते आहे. या नव्या इनिंगच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा...
तू दिग्दर्शनाकडून अभिनयाकडे कशी वळलीस?
- लहानपणापासूनच मला अभिनयाचे क्षेत्र भूरळ घालते. ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटावेळी मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा आंटी जेव्हा स्क्रिप्ट वाचत होत्या, तेव्हा त्याच मला म्हणाल्या,‘तू या चित्रपटात एखादा रोल का करत नाहीस? ’ त्यामुळे मग मी या रोलसाठी आॅडीशन दिलं. माझी लूक टेस्ट झाली. खरं तर मी खूप नर्व्हस होते. पण, माझी या रोलसाठी निवड झाली. रोल छोटा असून देखील खूप महत्त्वाचा आहे.
दिग्दर्शन आणि अभिनय यापैकी कुठले क्षेत्र तुला जास्त आवडते?
- अभिनय अर्थातच. मला लहानपणापासूनच अ‍ॅक्टिंग हे क्षेत्र खूप आवडतं. मी अजून शिकतेय. चित्रपटाच्या शूटिंगवेळी मी तास न् तास सेटवर जाऊन बसायची. मला अजून बरंच काही शिकायचंय. पण, ही छोटीशी भूमिका माझ्यासाठी खूप मोठी ठरणार आहे. चित्रपटसृष्टीत ‘हार्डवर्क’ला पर्याय नसतो. तुम्ही मेहनत करायलाच हवी. त्याशिवाय तुमची दखलही कुणी घेत नाही.
आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
- मराठी इंडस्ट्रीचं रूप आता पालटत आहे. खूप मेहनत, सहनशक्ती, संयम असणारा व्यक्तीच येथे काही करू शकतो. मी नशीबवान आहे की, मला माझ्या मेहनतीमुळे ‘व्हेंटिलेटर’ मध्ये असिस्टंट डायरेक्टरचं काम करायला मिळालं. खूप शिकायला मिळालं. आता या चित्रपटातील भूमिकेकडेही मी याच दृष्टिकोनातून पाहते आहे. आता तर माझी सुरूवात झालीय. नक्कीच पुढील प्रवास यशस्वीच आहे.
नव्या चित्रपटाबद्दल काय सांगशील?
- नव्या चित्रपटात मी प्रिती नावाची गंभीर भूमिका करत आहे. माझ्या एन्ट्रीने कथेला संपूर्णपणे टिवस्ट मिळतो. ती एक करिअर ओरिएंटेड मुलगी असून, एका बिझनेसमॅनसोबत तिचे लग्न झालेले असते. तसेच, चित्रपटाच्या टीमसोबत काम करायला खूप मजा आली. टीमकडून खूप शिकायला मिळालं. त्यांच्यातली एनर्जी पाहून मला देखील कामाचा खूप उत्साह यायचा.
तुझ्या आगामी प्रोजेक्टबद्दल
काय सांगशील?
- सध्या तरी मी एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. यानंतर नक्कीच एखाद्या नव्या भूमिकेसह प्रेक्षक ांच्या भेटीला येईन, हे नक्की.

Web Title: No hard work options!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.