'निवेदिता, माझी ताई!' उत्कंठावर्धक वळणावर, निवेदिता आणि यशोधनच्या लग्नात मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:40 PM2024-04-17T18:40:39+5:302024-04-17T18:41:03+5:30

Nivedita, Mazi Tai : 'निवेदिता, माझी ताई!' मालिकेत एक रंजक वळण आले आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न.

'Nivedita, mazi Tai!' In an exciting twist, Nivedita and Yashodhan's marriage takes a big twist | 'निवेदिता, माझी ताई!' उत्कंठावर्धक वळणावर, निवेदिता आणि यशोधनच्या लग्नात मोठा ट्विस्ट

'निवेदिता, माझी ताई!' उत्कंठावर्धक वळणावर, निवेदिता आणि यशोधनच्या लग्नात मोठा ट्विस्ट

'निवेदिता, माझी ताई!' (Nivedita, Mazi Tai) मालिकेतील असीम आणि निवेदिता यांची ही प्रेमळ गोष्ट प्रेक्षकांना विशेष आवडते आहे. पण मालिकेत एक रंजक वळण आले आहे. ते म्हणजे निवेदिताचं लग्न. निवेदिताचं लग्न झाल्यावर ती असीमपासून दुरावली जाणार का, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण निवेदिताचं लग्न मकरंदसोबत ठरलं आहे. मकरंदला निवेदितासोबत लग्न करायचं आहे, पण तो सायको असल्याचं यशोधनला समजतं. यशोधन पुरावे जमा करतो आणि निवेदिता आणि मकरंद यांच्या लग्नात येऊन मकरंदचं पितळ उघडं पाडतो.

ऐन लग्नात धमाल ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. निवेदिताचं लग्न कसं‌ पार पडणार, हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मकरंदसोबतचं लग्न मोडून मकरंदचा प्लॅन हाणून पाडण्यात यशोधनला यश मिळेल का? त्याचं निवेदितावर असलेलं प्रेम यातून त्याला व्यक्त करता येईल का, हे आपल्याला पाहायला मिळेल. मकरंदने रचलेला प्लॅन अखेर निवेदिता आणि त्याच्या लग्नाच्या दिवसापर्यंत येऊन ठेपला आहे. पण त्याचं या आधीचं लग्न आणि त्याने आखलेला प्लॅन यांबाबत निवेदिता आणि तिच्या घरचे अजूनही अनभिज्ञ आहेत. 


यशोधन सगळे पुरावे जमा करून मकरंदचा प्लॅन भर लग्नात सगळ्यांसमोर उघड करेल, पण यामुळे निवेदिता आणि मकरंद यांचं लग्न मोडण्यात त्याला यश मिळेल का? यापुढे मोठा प्रश्न उभा राहणार आहे तो म्हणजे निवेदिताच्या लग्नाचा. यशोधन सगळ्यांसमोर आपलं प्रेम व्यक्त करून निवेदितासोबत लग्नाला उभा राहणार असून निवेदिता आणि यशोधन यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे. पण या सगळ्यांत असीमची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उभा राहणार आहे. यशोधन असीमची जबाबदारी नक्की घेईल, असा निवेदिताचा समज आहे. निवेदिता आणि यशोधन यांचा विवाहसोहळा पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: 'Nivedita, mazi Tai!' In an exciting twist, Nivedita and Yashodhan's marriage takes a big twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.