निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!'चा प्रोमो रिलीज, भाऊ कदम-ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 01:03 PM2024-04-23T13:03:34+5:302024-04-23T13:07:56+5:30

Hastay Na ? Hasaylach Pahije Show : मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह निलेश साबळे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर नवा शो घेऊन येत आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' असे या शोचं नाव असून नुकताच त्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे. हा शो २७ एप्रिलपासून भेटीला येत आहे.

Nilesh Sable's new show 'Hastay Na? Hasaylach Pahije!' promo out, a hilarious comedy by Bhau Kadam-Omkar Bhojane | निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!'चा प्रोमो रिलीज, भाऊ कदम-ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी

निलेश साबळेच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!'चा प्रोमो रिलीज, भाऊ कदम-ओंकार भोजनेची धमाल कॉमेडी

मराठी छोट्या पडद्यावरील विनोदाचा बादशाह निलेश साबळे (Nilesh Sable ) लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर नवा शो घेऊन येत आहे. 'हसताय ना? हसायलाच पाहिजे' (Hastay Na ? Hasaylach Pahije Show) असे या शोचं नाव असून नुकताच त्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे. हा शो २७ एप्रिलपासून भेटीला येत आहे. 

'हसताय ना? हसायलाच पाहिजे' शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोत ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. यासोबत अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल या देखील ओंकार आणि भाऊच्या विनोदावर खळखळून हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांच्या वेशात दिसत आहेत. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचे दिसते. त्यामुळे शोच्या नवीन प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.


हसताय ना? हसायलाच पाहिजे या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळेने केले आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. २७ एप्रिलपासून हा शो शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Nilesh Sable's new show 'Hastay Na? Hasaylach Pahije!' promo out, a hilarious comedy by Bhau Kadam-Omkar Bhojane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.