मंदना झाली नर्व्हस
By Admin | Updated: September 6, 2015 02:41 IST2015-09-06T02:41:45+5:302015-09-06T02:41:45+5:30
पहिल्यांदा कॅमेऱ्याला फेस करणे कोणत्याही न्यूकमरसाठी सोपे नसते. मंदना करिमीच्या बाबतीतही असेच घडले आहे. तिने ‘भाग जानी’ चित्रपटादरम्यान पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता.

मंदना झाली नर्व्हस
पहिल्यांदा कॅमेऱ्याला फेस करणे कोणत्याही न्यूकमरसाठी सोपे नसते. मंदना करिमीच्या बाबतीतही असेच घडले आहे. तिने ‘भाग जानी’ चित्रपटादरम्यान पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. चित्रपटात येण्यापूर्वी मंदनाने प्रसिद्ध डिझायनरसाठी मॉडेलिंग केले आहे. आता ती शिवराम नायर यांच्या अॅक्शन थ्रिलर असलेल्या भाग जानी या चित्रपटात दिसणार आहे. कुणाल खेमूदेखील तिच्यासोबत काम करीत आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक न्यूकमरप्रमाणे जेव्हा मंदना पहिल्यांदा कॅमेऱ्याला फेस करीत होती त्या वेळी ती खूप अपसेट होती. चित्रपटाचा पहिला सीन इमोशनल तर होताच शिवाय डायलॉगदेखील मोठे लांबलचक होते. मंदना जेव्हा आपला सीन करीत होती त्या वेळी ती डायलॉग्स विसरली आणि स्तब्ध झाली. याबाबत ती म्हणाली की, सेटवर उपस्थित सर्व जण खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी मला खूप प्रोत्साहित केले.